(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 110 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 72 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 964 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 110 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 72 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24,875 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 92, 74,099 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 964 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 964 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 164 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट
देशातील कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये 10.6 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1270 नवीन रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1421 रुग्णांची नोंद आणि 149 जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 15 हजार 859 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार दिवसभरात देशात 1 हजार 567 रुग्ण कोरोनातून बरे झाले. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 859 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणुमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 35 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 83 हजार 829 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या
Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांध्ये 10.6 टक्क्यांनी घट, गेल्या 24 तासांत 1270 नवे रुग्ण
Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आठवडाभरात महानगरी 100 टक्के लसवंत...
Covid In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार; शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha