(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
महाराष्ट्रातही मास्कमुक्ती होऊ शकते का? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. यावर कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ राहुल पंडित यांनी एबीपी माझासोबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
Coronavirus Mask Free : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पण लसीकरण पूर्ण झालेले काही देश मास्क मुक्तीकडे वळले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे मास्कमुक्ती करण्यात आली आहे. तशीच महाराष्ट्रातही मास्कमुक्ती होऊ शकते का? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. यावर कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ राहुल पंडित यांनी एबीपी माझासोबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
राज्यातील सध्याची स्थिती पाहा मास्क मुक्त समाज ही कल्पना पुढील काही महिने तरी शक्य वाटत नाही, असे स्पष्ट मत डॉ राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. लसीकरणाचा टप्पा जसा वाढत आहे तसे लोकांना मास्कमुक्ती होणार का ? असे वाटत आहे.
मागील दोन वर्षापासून आपण मास्क घालत आहोत आणखी किती दिवस मास्क घालायचं ? यावर बोलताना डॉ राहुल पंडित म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेलं नाहीये. मुंबईत जरी लसीकरण मोठ्याप्रमाणावर झालं असलं तरी मुंबईमध्ये बाहेरून येणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. ओमायक्रोन वॅक्सिंग इम्युन एस्केप नावाचा फेनोमेना आहे. ओमायक्रॉनपासून बचावासाठी अजूनही मास्क हे शस्त्र आपल्याकडे आहे. जेणेकरून आपण स्वतःला सुरक्षित राहू आणि इतरांना सुद्धा मास्कमुळे संसर्ग होणार नाही. सद्यस्थितीत मास्क मुक्त समाज ही कल्पना अजून काही महिने तरी शक्य वाटत नाही, असे डॉ. राहुल पंडित म्हणाले.
कुठले देश मास्कमुक्तीच्या दिशेने ?
इस्रायल - इस्त्रायलमध्ये 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याने मास्कचा वापर बंधनकारक नाही.
न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्ये मास्क वापरण्याची सक्ती नाही.
इंग्लंड - इंग्लंड मास्कमुक्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :