Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत, 973 नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 973 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज 22 महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू तर तीन महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला झालेला नाही.
राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4629 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 173 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 7 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 76 लाख 58 हजार 977 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 128 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 128 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 014 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 128 रुग्णांपैकी 15 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 102 बेड्सपैकी केवळ 721 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha