Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 4004 रुग्णांची नोंद तर 3085 कोरोनामुक्त
Coronavirus : राज्यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.86 टक्के इतकं झालं असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.84 टक्के इतका आहे.
![Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 4004 रुग्णांची नोंद तर 3085 कोरोनामुक्त Maharashtra Corona Update 4004 patients registered in the state on Sunday and 3085 corona free Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 4004 रुग्णांची नोंद तर 3085 कोरोनामुक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/fb9355b7059d9970d69f2136f56b38e4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल 4004 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,64,117 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.84 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 23,746 सक्रिय रुग्ण संख्या आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे.
देशातील कोरोना संसर्ग मागील काही दिवसांपासून वेगवान होताना दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 12 हजार 899 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार सध्या एकूण 72 हजार 474 सक्रिय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर 8 हजार 518 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे. आदल्या दिवशी 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे.
संबंधित बातम्या
Covid19 : कोरोनाचा आलेख किंचित घसरला, देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 899 नवीन कोरोनाबाधित, 15 रुग्णांचा मृत्यू
Covid19 Rate Hike : चिंताजनक! कोरोना आलेख वाढताच, देशात आठवड्याभरात संक्रमणात 72 टक्क्यांची वाढ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)