Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला! गुरूवारी 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे
मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.
राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही
राज्यात आज ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 36 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 83 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के आहे. सध्या राज्यात 17 लाख 95 हजार 631 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 13 , 59, 539 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त
मागील 24 तासांत 13 हजार 702 नवे कोरोनाबाधित सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास तीन हजाराने कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Bank : आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा झटका, प्रवीण दरेकांच्या हातून मुंबै बँकेची सत्ता खेचली
- Marathi Board on shops: राज्य सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध
- काँग्रेस गोव्यात सिंगल डिजिट, तर यूपीत शून्य जागा; दोन राज्यांत, दोन नेत्यांची भविष्यवाणी