(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 318 रुग्णांची नोंद तर 355 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे.
मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 318 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 355 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,19, 949 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 18, 633 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 566 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7, 85, 28, 186 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 2925 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 2925 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 381 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 244 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 रुग्ण
देशात अजूनही दररोज कोरोना विषाणूच्या चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 4 हजार 194 नवीन रुग्ण आढळले असून 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या 6 हजार 208 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 रुग्ण, 255 जणांचा मृत्यू