Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 रुग्ण, 255 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 4 हजार 194 नवीन रुग्ण आढळले असून 255 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात अजूनही दररोज कोरोना विषाणूच्या चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 4 हजार 194 नवीन रुग्ण आढळले असून 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या 6 हजार 208 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 42 हजार 219 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 6 हजार 208 लोक बरे झाले होते. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 42 हजार 219 वर आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 714 वर पोहोचली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 26 हजार 328 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 179 कोटी डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 179 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 16 लाख 73 हजार 515 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 179 कोटी 72 लाख 515 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन कोटींहून अधिक (2,10,55,540) प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. तर, कोरोना योद्धांसाठी लसीकरण मोहीम 2 फेब्रुवारीपासून सुरू झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi Gujrat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर, पाहा कसा असेल कार्यक्रम...
- Russia Ukraine War : 'रशियाशी लढण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही हेतू नाही', व्हाईट हाऊसचं वक्तव्य
- अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मारला गेला अबू इब्राहिम अल-हाशिमी, ISISकडून वृत्ताला दुजोरा, नव्या नेत्याची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha