Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 13 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात आज 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,373 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,10,356 इतकी झाली आहे. आज 257 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,32,597 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,63,420 (15.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,06,506 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,695 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 13 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजवर 688340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,751 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे.
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय संस्था एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज सांगितले की, येत्या 6 ते 8 आठवड्यांत देशात पुन्हा कोरोना साथीचा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि या लाटेला थांबवणे अशक्य आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्याबरोबरच डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, देशातील मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करुन अधिकाधिक लोकांना कोरोनापासून सुरक्षित करणे हे देशातील मुख्य आव्हान आहे. तसेच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे योग्य निर्णय आहे, कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवले जाऊ शकते.