एक्स्प्लोर

Maharashtra: हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे जंगलराज; काँग्रेसची टीका

Violence In Maharashtra: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे जंगलराज सुरू असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

Maharashtra Violence: गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणाऱ्या मुंबई आणि परिसरात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून शिंदे फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? राज्याला गृहमंत्री आहेत का? असे प्रश्न पडावेत इतकी भयावह अवस्था राज्यात सुरू आहे. राज्याच्या विविध भागातून दररोज खून, बलात्कार, दरोडे, दंगली, विरोधकांना जीवे मारण्याच्या धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ल्यांच्या बातम्या येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा शहरांमध्ये दंगली झाल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या शहरांमधून तणावाच्या घटना घडत आहेत. सरकारच्या आशिर्वादाने सत्ताधारी पक्षांकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असून जाणिवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पहात बसले आहेत तर गुंड आणि समाजकंटक दररोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत, असेही त्यांनी म्हटले. 

राज्यात आता विरोधी पक्षांच्या नेत्यांना गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारविरोधात बोलणे बंद करा अन्यथा तुमचा दाभोळकर करू असे म्हटले जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे असे कधी घडले नव्हते. पण ज्या विचारांनी नरेंद्र दाभोलकर आणि क्रॉमेड पानसरेंना संपवले त्या विचारांचे लोक आता लोकशाही मानणाऱ्या पुरोगामी विचारांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवण्याची भाषा करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. 

सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटले आहे. या सरकारच्या अकार्यक्षमतेने सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तबच केले असल्याचा टोला त्यांनी लगावला. या सरकारला कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसावे. आम्ही सत्तेत आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांवर २४ तासांत कठोर कारवाई करून त्यांना सुतासारखे सरळ करू असेही नाना पटोले यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्याNarendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीतPM Modi Wardha Daura :  पीएम विश्वकर्मी योजनेचा वर्षपूर्ती सोहळा,  मोदींच्या वर्धा दौऱ्यात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Embed widget