(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chitra Wagh: भाजप मेळाव्यात चित्रा वाघ कडाडल्या'; आपल्याच महिला पदाधिकाऱ्यांवर केली 'फायरिंग'
Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्या 'फायरिंग मुळे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांचा हिरमोड झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
Chitra Wagh : भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या उपस्थितीत सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar City) महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या मेळाव्यात अनेक भाजपची मंत्री आणि नेते उपस्थित होते. मात्र चर्चा भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या एका व्हिडिओची झाली. ज्यात चित्रा वाघ आपल्याच महिला पदाधिकारी यांना दम देताना दिसत आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या 'फायरिंग मुळे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांचा हिरमोड झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात जी-20 परिषदेच्या बैठकींनिमित्ताने स्मृती इराणी शहरात आल्या होत्या. दरम्यान याचवेळी भाजप महिला मोर्च्याच्यावतीने 'सेल्फी विथ लाभार्थी' (Selfie With Beneficiary) मेळावा आयोजित करण्यात आला होता. शहरातील तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या या मेळाव्यास भाजपच्या मंत्र्यांसह महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी चित्रा वाघ यांनी महिला कार्यकत्यांना उद्देशून केलेली 'फायरिंग' चुकीची यावेळी चर्चेचा विषय बनला आहे.
नाव पुकारल्याशिवाय कोणीही स्टेजवर यायचे नाही
यावेळी स्मृती इराणी यांच्यासोबत योजनांच्या लाभार्थ्यांना सेल्फी काढण्याची संधी देण्यात आली होती. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी चित्रा वाघ सभागृहात आल्या. सभागृहात येताच त्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या व लाभार्थ्यावर चिडल्या. स्मृती इराणी मंचावर आल्यानंतर नाव पुकारल्याशिवाय कोणीही स्टेजवर यायचे नाही, असे म्हणत त्यांनी दम दिला. एवढच नाही तर, तुम्ही खुर्चीवर बसलेल्या दिसलात तर मी वरून उठवून देईन, असा दमही त्यांनी दिला. यामुळे स्मृती इराणी यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा बाळगून असलेल्या महिलांना व लाभार्थ्यांना ही वागणूक अपमानास्पद वाटल्याची चर्चा आहे.
भाजपकडून 'सेल्फी विथ लाभार्थी'
भाजप सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून (BJP) नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने अभियान राबवले जातात. आता असाच काही आगळावेगळा उप्रकम भाजपच्या नेत्या तथा महिला-बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून राबवला जात आहे. 'सेल्फी विथ लाभार्थी' असे या उपक्रमाचे नाव असून, विविध योजनेच्या लाभार्थ्यांसोबत स्मृती इराणी या सेल्फी घेत आहेत. तर देशभरात अशा एक कोटी महिलांसोबत त्या सेल्फी घेणार आहेत. विशेष म्हणजे अभियानाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातून झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: