एक्स्प्लोर

28 तारखेला सायंकाळी 5.30 वाजता शपथविधी, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेणार

Maharashtra case Supreme court to decide when and how of maharashtra floor test today 28 तारखेला सायंकाळी 5.30 वाजता शपथविधी, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेणार

Background

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला एक अनपेक्षित घटना घडली असून त्यावरून राजकीय समीकरणांमध्ये बदल घडून आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या आदेशानुसारच हे सरकार स्थापन करण्यात आले असल्याचा दावा भाजपने केला. तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, राष्ट्रवादीचा त्यांना कोणत्याही स्वरूपात पाठिंबा नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने ताबडतोब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी केलेली विनंती मान्य करायची की नाही व मान्य केली तर विश्वासदर्शक ठराव केव्हा मंजूर करून घ्यायचा, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी ११ वाजता देणार आहे.

हा महाराष्ट्र आहे, फोडाफोडी करायला हे गोवा-कर्नाटक नाही; शरद पवारांचा भाजपला इशारा

फडणवीस आणि पवार यांच्याकडे बहुमत नसूनही त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी कशी दिली? राज्यपालांचा हा निर्णय रद्द करावा आणि आम्हाला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा दोन प्रमुख मागण्या करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी केलेल्या याचिकेवर न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे लागोपाठ दुसऱ्या दिवशी, सोमवारी साधारणतः 80 मिनिटं सुनावणी करण्यात आली. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी मंगळवारी आदेश देण्यात येईल असं जाहीर केलं.

पाहा व्हिडीओ : व्हिपचा अधिकार कुणाचा? माझा विशेष

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा दिला. त्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. परंतु भाजपकडे सत्तास्थापन करण्यासाठीचे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. कारण आज मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 162 आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यानी भाषण करताना उपस्थित आमदार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनोधैर्य वाढवलं.

पाहा व्हिडीओ : माझं अजित पवारांवर असलेलं प्रेम वेगळं, मात्र मी शरद पवार साहेबांसोबतच - धनंजय मुंडे

संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये राज्यपालांना केलं टॅग

शक्तीप्रदर्शनापूर्वी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, आम्ही सर्व एक आहोत. तुम्ही आमच्या 162 आमदारांना पहिल्यांदा हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे पाहू शकाल. असं ट्वीट करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनाही टॅग केलं होतं.

19:33 PM (IST)  •  26 Nov 2019

'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडीच्या नावाला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांचं अनुमोदन
19:47 PM (IST)  •  26 Nov 2019

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Embed widget