एक्स्प्लोर

Raigad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली; 51 जण बेपत्ता, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे पाच मजली इमारत कोसळली. यात 50 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरु असून आठ जणांना बाहेर काढण्यात आले असून एकाचा मृत्यू झालाय.

रायगड : महाड शहरात पाच मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 हून अधिक नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, 8 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. यातील एकाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली असून प्रशासनाला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी सायंकाळी महाडला हादरविणारी घटना घडली आहे. शहरांतील काजळपूरा येथील पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 हून अधित लोक आडकल्याची भिती व्यक्त होत आहे. जखमींना काढण्यासाठी एनडीआर‌एफला पाचारण करण्यात आले आहे. आज सायंकाळी 6 वाजनेच्या सुमारास महाड मुंबई मार्गावरील काजळपूरा येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत पिलर फुटल्याने पत्त्यासारखी कोसळली. महाड इमारत दुर्घटना संदर्भातील बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री हे खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या संपर्कात असून बचावकार्याची माहिती घेत आहेत. बिल्डर कोहीनुर डेव्हलपर्स, पनवेल यांच्या फारुक म्हामुदमिंया काझी याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजपाचे जिल्हासरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी केली आहे. नगरपालिकेने जेव्हा या इमारतीला कम्प्लीशन सर्टीफीकेट दिलेच कसे ? या विरोधात 2011 ला महामुणकर यांनी सदर इमारतीचे स्ट्रकचर ऑडीट करावे अशी मागणी केली होती. सदर इमारत ही निकृष्ट बांधाकामुळेच कोसळल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप हजर झाले आहेत. Raigarh Building Collapse Live : आतापर्यंत आठ जणांना वाचवण्यात यश; सात जण जखमी तर एक मृत महाड येथील दुर्घटना व तेथील परिस्थितीबाबत आतापर्यंतचे अपडेट्स :
  • रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळून काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती.
  • जिल्हा प्रशासनाची तात्काळ मदत व बचाव कार्यासाठी तत्परता. पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडमध्ये
  • माणगाव,पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, ॲम्बुलन्स, जनरेटर, जेसीबी, डंपर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर तात्काळ पाठविण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहाचण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • मेडिकल कॅम्पसाठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
  • जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज.
  • पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज. रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज.
  • मदतीसाठी रिलायन्स नागोठणे, पोस्को कंपन्याही सरसावल्या पुढे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन.
  • सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याकडून उद्याच रक्तदान शिबिराचे आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांचे तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश. आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले असून सात जण जखमी तर एकाचा मृत्यू.
  • संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे संपूर्ण लक्ष. घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय.
Raigad | रायगडमध्ये कोसळलेल्या इमारतीखाली अजूनही 70 ते 80 जण, बचावकार्य सुरू, एनडीआरएफ घटनास्थळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
Embed widget