एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raigad Building Collapse Live | रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
Maharashtra Raigarh Buidling Collapse Live :रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली आहे.
LIVE
Background
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही 19 ते 20 रहिवासी अडकले आहेत. या दुर्घटनेत समीर सय्यद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आमदार अवधूत तटकरे यांनी दिली. दरम्यान एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
19:31 PM (IST) • 25 Aug 2020
रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
16:01 PM (IST) • 25 Aug 2020
#महाडइमारतदुर्घटना, रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू
13:17 PM (IST) • 25 Aug 2020
रायगडमधील इमारत दुर्घटनेत बचावकार्य युद्ध पातळईवर सुरु असून ढिगाऱ्याखालून एका बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. साडेतीन वर्षाचा मोहम्मद बांगी हा मुलगा सापडला असून त्याला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. बाळाला बाहेर काढताच जल्लोष करण्यात आला. तसेच गणपत्ती बप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
11:56 AM (IST) • 25 Aug 2020
रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कालचा एक आणि आज चार मृतदेह दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली 18 ते 19 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
08:30 AM (IST) • 25 Aug 2020
दुर्घटनाग्रस्त इमारतीचा बिल्डर पसार झाला असून ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल, स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांची माहिती
Load More
Tags :
Maharashtra Building Collapses Raigarh District Buidling Collapse In Raigarh Raigarh Building Collapseमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
Advertisement