Maharashtra Budget : दवाखान्यात आता पाच लाखांपर्यंत उपचार मोफत, महात्मा फुले योजनेची व्याप्ती दीड लाखावरुन पाच लाखांपर्यंत
Devendra Fadnavis : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता राज्यातील आणखी 200 रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
Maharashtra Budget 2023: राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा आरोग्य क्षेसासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रासाठी 3 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेची व्याप्ती आता दीड लाखावरून पाच लाख इतकी करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. तर राज्यभरात 700 नवीन स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
देशाची वाटचाल पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे सुरु असताना त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा एक ट्रिलियन डॉलर्स असावा असा प्रयत्न राज्यसरकारचा असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेसंबंधी महत्त्वाची घोषणा
- महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
- त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
- नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
- मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
- राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य
- अंत्योदयाचा विचार
- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या पाच अमृतांवर आधारित वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
काय आहे पंचामृत योजना?
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )