Maharashtra News LIVE Updates : अखेर ठरलं! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, निवडणुकीला रंगत चढणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधिंमडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेनात विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांना चोख उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय पातळीवर सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनातही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे.
दुसरीकडे राज्यात मुंबई, कोकण भागात मौसमी पाउस चालू आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी जोमात बरसतायत तर काही ठिकाणी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. या घडामोडी तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लीकवर...
वाहन चालकांसाठी खुशखबर, जगातील पहिल्या सीएनजी बाईकचं अनावरण!
जगातील पहिल्या सीएनजी बाईकचं अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. बजाज कंपनीने या पहिल्या-वहिल्या सीएनजी बाईकची निर्मिती केलीये. सीएनजी प्लस पेट्रोल अशी ही हायब्रीड बाईक आहे. दोन किलो सीएनजी आणि दोन लिटर पेट्रोल वर ही बाईक 330 किलोमीटरचं अंतर कापते. तीन मॉडेलमध्ये असलेल्या या बाईकची 95 हजारे ते एक लाख 10 हजार इतकी किंमत आहे.
मोठी बातमी! पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर
पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर
शंभूराज देसाई यांनी मांडलं विधेयक
परीक्षतेल्या तोतयागिरी, फेरागिरीला बसणार आळा
अपराध करणाऱ्या व्यक्तीला ३ ते १० वर्षांची शिक्षा, तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद
अखेर ठरलं! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, निवडणुकीला रंगत चढणार
विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली
विधानपरिषद निवडणुकीतून कुणीही माघार घेतली नाही
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार
गुप्तपद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता
मोठी बातमी! अजित पवार वारीत सहभागी होणार, वारकऱ्यांसोबत चालणार
हल्ली सर्वांना वारीत चालावे असे वाटते त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे- अजित पवार
जयंत राव येतील असे मला वाटत नाही. ते आले तर मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे- अजित पवार
Hathras Stamped : भोले बाबाचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा देवप्रकाश मधुकर अजूनही फरार
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस दुर्घटना प्रकरण
सत्संग आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर अजूनही फरार
मधुकर याला शोधून देणाऱ्याला एक लाख रुपयांच बक्षीस
उत्तर प्रदेश मधल्या सलीमपूर गावचा रहिवासी देवप्रकाश मधुकर
देवप्रकाशच्या घराला सध्या कुलूप असल्याची माहिती
देवप्रकाश हा भोले बाबाचा आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती समोर
उत्तर प्रदेश पोलिसांकडून देवप्रकाशचा शोध सुरू