Maharashtra Breaking News Live Updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात येणार, मोठा रोड शो करणार
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम चालू आहे. ज्या नेत्यांना आपापल्य पक्षांकडून तिकीट मिळाले आहे, त्यांनी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. तर ज्यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे किंवा अन्य पर्यायाचा विचार केला जातोय. दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यातील काही जागांचा वाद अद्याप संपलेला नाही. असे असताना राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजप माजी आमदार बाळा भेगडे सागर बंगल्यावर दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजप माजी आमदार बाळा भेगडे सागर बंगल्यावर दाखल
दोन्ही नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार चर्चा
सुनील शेळकेंना उमेदवारी दिल्याने भेगडे आणि भाजप कार्यकर्ते नाराज
शेळकेंविरोधात प्रचार करण्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला होता पवित्रा
अखेर वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस करणार मध्यस्थी
निलेश राणे थोड्याच वेळात वर्षावर जातील, एकनाथ शिंदे यांची घेणार भेट
निलेश राणे थोड्याच वेळात वर्षावर जातील
एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या यादीत निलेश राणेंच्या नावाचा समावेश असणार आहे
यामुळे निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार आहेत
Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात येणार, मोठा रोड शो करणार
पुण्यात राहुल गांधींचा रोड शो
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात करणारं रोड शो
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी पुण्यात
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात राहुल गांधी करण्यात भव्य रोड शो
पुण्यातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्याकडून राहुल गांधींना रोडशोसाठी आमंत्रण
लवकरच राहुल गांधी तारीख कळवणार
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी अजित पवार गटात दहा जागांवरून तिढा कायम
राष्ट्रवादी अजित पवार गटात दहा जागांवरून तिढा कायम
आतापर्यंत एकूण 49 जागांवर उमेदारांची घोषणा करण्यात आलीय
महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँगेस पक्षाला 60 जागा सुटण्याची शक्यता होती
माञ युतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आद्याप दहा जागांवर तिढा असल्याची माहिती मिळत आहे
या जागां संदर्भात सध्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत
Palghar : पालघरसाठी महायुतीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा नाही, एकनाथ शिंदेंचे विश्वासू अजूनही वेटिंगवर
पालघर
पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असला तरीही महायुतीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू श्रीनिवास वनगा अजूनही वेटिंगवर
श्रीनिवास वनगा यांच्यासोबत भाजपमध्ये असलेले राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा