Maharashtra News Live Updates: मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट कायम
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra News Live Updates: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
Rain Update : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट कायम
Rain Update : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज देखील मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून आॅरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आलाय, मात्र कालपेक्षा तीव्रता कमी असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून सांगण्यात येत आहे
मुंबई आणि उपनगरात काही मोजक्या ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे
किनारपट्टी भागातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या उत्तरेकडे सरकल्याने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज
पालघर आणि नाशिकात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी
सोबतच, धुळे, नंदुरबारमध्ये देखील धुंवाधार पावसाचा इशारा, आॅरेंज अलर्ट जारी
पुण्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, आॅरेंज अलर्ट जारी
मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
अहमदनगरमध्ये धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधीचा इशारा...
धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधीचा इशारा...
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदिकाठी आंदोलकांची सापडली चिठ्ठी...
आम्ही जलसमाधी घेत आहोत.. यास सर्वस्वी सरकार जबाबदार असा मजकूर असलेली चिठ्ठी..
गोदावरी नदीकाठच्या पुलावर सापडल्या चपला...
दोघांनी नदीत उडी घेतल्याची चर्चा.. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा नाही...
दोघांचे फोनही नाॅटरीचेबल...
प्रल्हाद सोरमारे आणी बाळासाहेब कोळसे दोन तासापासून उपोषण स्थळवरून बेपत्ता...
गेल्या नऊ दिवसापासून नेवासाफाटा येथे आमरण उपोषण सुरू...
सरकार दखल घेत नसल्याने दिला होता जलसमाधीचा इशारा...
नेमका स्टंट की जलसमाधी याबाबत अधिकृत माहिती अद्याप नाही..























