(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking LIVE 22nd August: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 22nd August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...
LIVE
Background
Maharashtra Breaking 22nd August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...
1. बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल, खंडपीठापुढे आज तातडीची सुनावणी
2. नराधम अक्षय शिंदेच्या आई-वडिलांशी एबीपी माझाची चर्चा, म्हणाले, अक्षय निर्दोष, त्याला फसवलं जातंय, स्थानिकांकडून कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप
3. बदलापुरात 24 तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, व्यवहार हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त कायम
4. बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग, शाळांमधील सुरक्षेसंदर्भात उपायोजनेचा जीआर जारी, शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रुम तयार करण्याचे आदेश, 7 जणांची समिती गठित
5. आयबीपीएस आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्याच्या मुद्यावर आज एमपीएसची बैठक, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग्य निर्णय घ्या असा शरद पवारांचा इशारा
जाती-जातींमध्ये दरार निर्माण करणाऱ्या विकृतींना बळी पडू नका : उदयनराजे भोसले
अलीकडच्या काळातील काही विकृती पाहायला मिळते. समाजाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणातून व्यक्ती केंद्रित लोक स्वतःचे हित साधण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजांमध्ये दरार निर्माण करण्याचे काम करत आहेत. अशा गोष्टींना बळी पडू नका, असे आवाहन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
Igatpuri News : इगतपुरी घोटी येथील स्टेट बँकेसमोर महिलांची मोठी गर्दी
Igatpuri News : महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी महिलांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. घोटी येथील स्टेट बँकेच्या परिसरात रात्री आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आणि अन्य तांत्रिक कामं करता महिलांची बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र बँकेत येणाऱ्या महिलांनी रात्री चक्क बँकेचे बाहेर मुक्काम केला स्टेट बँक प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप देखील महिला करत होत्या त्यामुळे प्रशासन आणि महिलांमध्ये काही काळ वाद देखील झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र सध्या घोटी परिसरातील स्टेट बँकेची परिसरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Sangali News : 25 ऑगस्टला श्री शिवप्रतिष्ठाननं जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे घेतला
Sangali News : 25 ऑगस्टला श्री शिवप्रतिष्ठानने जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे घेतला
25 ऑगस्ट रोजी श्री शिवप्रतिष्ठानने बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हा बंदचा दिला होता इशारा
पण बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचाराच्या बाबतच्या मागणीवर येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे निर्णय घेतला जाईल
24 ऑगस्टला मविआ कडून पुकारण्यात आलेला बंद आणि 25 ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठानने 24 ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेण्याचा घेतला निर्णय
Eknath Khadse : एकनाथ खडसे नेमके कुणाचे? राष्ट्रवादीचे की भाजपचे?
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या मौनात दडलंय काय, खडसे अजूनही राष्ट्रवादीचे की भाजपचे असा सवाल उपस्थित झालाय. खडसेंनी लोकसभा निवडणुकीच्याआधी भाजप प्रवेशाचं सूतोवाच केलं. भाजप नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. एवढंच नाही तर एबीपी माझाच्या प्रतिनिधीला भाजप प्रवेश करत असल्याचं फोनवरून सांगितलंही. मात्र अजूनही खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते अजूनही पूर्णपणे भाजपवासी झालेले नाहीत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित होतोय. 25 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आहेत या कार्यक्रमात खडसें जाणार का याकडेही राज्याच लक्ष लागले आहे
Pune News : पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी
Pune News : पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य शिवाजी सौदागर (वय 23) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर बुधवारी सायंकाळी थांबला होता. त्या वेळी अचानक झाडाची फांदी त्याच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.