एक्स्प्लोर

Gram Panchayat Election: सरपंचपदासह अख्खी ग्रामपंचायत लिलावात विकली, आता प्रकरण न्यायालयात

Gram Panchayat Election: न्यायालयाने प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग (State Election Commission), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. 

Gram Panchayat Election: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान न घेता सरपंच, उपसरपंच आणि 8 सदस्य पदांचा लिलाव (Auction) करून विकण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादच्या (Aurangabad) 'सेलूद' ग्रामपंचायतीमध्ये समोर आला होता. या सर्व लिलावाचा एक व्हिडीओ (Video) देखील समोर आला होता. तर या लिलावात एकूण 28 लाख 56 हजार रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र, याच ग्रामपंचायतीमधून 4 लाखांची बोली लावून उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या राजू गणपत म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. तर न्यायालयाने प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग (State Election Commission), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. 

राज्यभरात नुकत्याच सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 216 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहे. दरम्यान यातील काही ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्याचे पाहायला मिळाले होते. याच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतपैकी औरंगाबाद तालुक्यातील शेलुद ग्रामपंचायत देखील होती. मात्र एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शेलुद ग्रामपंचायत निवडणुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. ज्यात गावातील मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. ज्यात सदस्य पदासाठी 70 हजारांपासून तर 2 लाखांपर्यंत बोली लागली होती. तर सरपंच पद साडेचौदा लाखात आणि उपसरपंच पद 4 लाखात विकल्याचा आरोप करण्यात आला होता. 

तीन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

मात्र लिलाव न पटल्यामुळे 4 लाख देऊन उपसरपंच झालेल्या राजू म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन हा सर्व प्रकार समोर आणला होता. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याबाबत निवदेन देखील दिले होते. तसेच आता त्यांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. तसेच या याचिकेवर तीन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. 

असा झाला लिलाव...

अ.क्र. पद पदाची रक्कम  उमेदवारचे नाव
1 सरपंच   1450000  शकुंतला योगेश ससेमहाल 
2 उपसरपंच    400000  राजू गणपत मस्के
3 एस.सी.महिला   171000  दर्शना राजू मस्के 
4 ओबीसी महिला   75000  माधुरी अशोक चोरमारे 
5 सर्व साधारण पुरुष   125000  मधुकर अंकुश चौधरी 
6 सर्व साधारण महिला   111000   आशा भरत चौधरी
7 सर्व साधारण महिला   121000  शाहीन सुभान शहा 
8 सर्व साधारण महिला   151000  द्वारकाबाई एकनाथ नरवडे
9 सर्व साधारण पुरुष   201000  ज्ञानेश्वर दत्तू नरवडे 
10

सर्व साधारण पुरुष 

51000  किसन बळवंत चौधरी 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

HSC Exam: बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जण जालन्यातील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget