एक्स्प्लोर

Aurangabad: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर नव्हे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करा; चित्रा वाघ यांची मागणी

Aurangabad News: औरंगाबाद येथील भाजपच्या सभेत  बोलतांना चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Aurangabad News: गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी याच नामांतराच्या मुद्यावरून केलेल्या एका विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) नव्हे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असे करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. औरंगाबाद येथील भाजपच्या सभेत  बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून आधी संभाजीनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि आता धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ही मागणी केली आहे.  हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलतांना चित्रा वाघ यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर नव्हे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असे करण्याची मागणी केली आहे. तर याबाबत आपण शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी देखील करणार असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. 

काय म्हणाल्या चित्रा वाघ! 

यावेळी बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्यात की, कुठलाही विषय नसतांना देखील छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला गेला. अजित पवार म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हतेच. या राज्यातील मुलामुलाला माहित आहे की, धर्माचे रक्षण करण्यासाठी राजेंनी काय केले आहे. यासाठी त्यांनी आपला जीव दिला आणि प्राण पणाला लावले. त्यामुळे राज्यभरात भाजपच्या वतीने अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.  तर मी शिंदे-फडणवीस सरकारकडे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर न ठेवता धर्मवीर संभाजीनगर ठेवण्याची मागणी केली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. 

नामांतराचा दोन वेळा निर्णय...

औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्यात नव्याने शिंदे फडणवीस सरकार आली. त्यांनी देखील पुन्हा नव्याने औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देत औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. आता याचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पण त्यातच आता जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर नव्हे तर धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM : 02 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM  : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 02 Oct 2024 Marathi NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6:30  AM :  2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
2 महिन्यात 48 लाख नवरदेव बोहल्यावर चढणार,  6 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार, शुभ मुर्हत कधीपासून?
2 महिन्यात 48 लाख नवरदेव बोहल्यावर चढणार,  6 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार, शुभ मुर्हत कधीपासून?
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
Horoscope Today 02 October 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्वपित्री अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
तुम्हाला माहितीय? स्वर्गाचा रस्ता भारतातून जातो... कुठून? स्वतःच जाणून घ्या!
तुम्हाला माहितीय? स्वर्गाचा रस्ता भारतातून जातो... कुठून? स्वतःच जाणून घ्या!
Bigg Boss 18: एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
Embed widget