Amravati Crime : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA ने आणखी दोन आरोपींना घेतलं ताब्यात; हत्येमागे PFI चा कट?
Amravati Crime : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा कट असण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
Amravati Crime : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA ने आणखी दोन आरोपींना घेतलं ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या हत्येमागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा कट असण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे हे सदस्य असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA ने आणखी दोन आरोपींना घेतलं ताब्यात
उमेश कोल्हे यांची अमरावतीत गळा चिरून हत्या झाली होती. या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, ताब्यात घेतलेले दोन आरोपी पीएफआयचे सदस्य असल्याची माहिती मिळत आहे. उमेश कोल्हे हत्येच्या वेळी शहरातील 10 जणांना धमक्या आल्या होत्या. अनेकांनी या प्रकरणी व्हिडीओ बनवत माफीनामा दिला होता. यातील एकाने पोलिसांत तक्रार दिली होती. त्या आधारे पोलिसांनी काल रात्री चार ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
हत्येमागे PFI चा कट?
नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं उमेश कोल्हेंची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती, याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आज NIA उमेश कोल्हे हत्येतील सात आरोपींना आणि आज ताब्यात घेतलेले दोन अशा नऊ आरोपींना मुंबईला घेऊन जाणार असल्याचे समजते. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या या आरोपींपैकी चार आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले.पण यावेळी NIA चे अधिकारी ही न्यायालयात असल्याने सगळ्या आरोपींना न्यायालयात आणण्याचे आदेश दिल्याने NIA ने आरोपींचा ताबा घेतला. असे न्यायालयाने सांगितले, मुंबईत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.
काय आहे PFI?
"पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया किंवा पीएफआय ही एक इस्लामिक संघटना आहे. ही संघटना मागासलेल्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी एक आवाज म्हणून स्वतःचे वर्णन करते. या संघटनेची स्थापना 2006 मध्ये नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट (NDF) चे उत्तराधिकारी म्हणून करण्यात आली होती. या संघटनेची केरळमध्ये पाळेमुळे असल्याचे समजते.
इतर महत्वाच्या बातम्या