कुशिवली धरणाच्या भू-संपादनात कोट्यवधींचा घोटाळा; शेतकऱ्यांच्या जागी उभे केले बोगस व्यक्ती, नायब तहसिलदारासह 29 जणांना अटक
Kushivali Dam Scam : या घोटाळ्यात एका नायब तहसीलदारासह 29 जणांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांना अटक करण्यात आलीय.

Kushivali Dam Scam : अंबरनाथ तालुक्यातील प्रस्तवित कुशिवली धरणाच्या भू संपादनात मोठा घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्यात एका नायब तहसीलदारासह 29 जणांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढणार असून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
कुशिवली धरणाच्या भू-संपादनात मोठा घोटाळा, शेतकऱ्यांच्या जागी उभे केले बोगस व्यक्ती
अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाच्या याच जागेत धरण बांधले जाणार आहे. धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा संपादित करण्याचे करून त्या जागेच्या मोबदला दिला जात आहे. मात्र मोबदला देण्याच्या या सगळ्या प्रकरणात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. इथे मूळ जागा असणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याऐवजी तो दुसऱ्यानेच लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मूळ शेतकऱ्याच्या जागी बोगस व्यक्ती उभे करून त्याची बनवट कागदपत्रे तयार करून कोट्यवधीचा मोबदला परस्पर लाटण्यात आला. 25 शेतकऱ्यांचे तब्बल 11 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा घोटाळा उघड झाला आहे.
नायब तहसिलदारासह एकूण 29 लोकांना अटक
उल्हासनगर उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना ऑक्टोबर 2021 आली या भू संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला काही लाभार्थी शेतकऱ्यांची कागदपत्र तपासताना संशय आला त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची कागदपत्र तपासली असता प्रथम दर्शनी त्यांना ही कागदपत्रे खोटी असल्याचं जाणवलं, याची त्यांनी चौकशी करून शहानिशा केली असता धनादेश घेण्यासाठी आलेले शेतकरी हे बोगस असल्याचं समोर आलं. त्यानंतर कारभाऱ्यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार देत गुन्हा दाखल केला. आत्तापर्यंत या प्रकरणात आणखीन काही प्रकरण समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते
घोटाळ्याची व्याप्ती वाढणार
दरम्यान आता या घोटाळ्याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसात एकूण चार गुन्हे दाखल झाले असून तीस जणांना अटक करण्यात आले यामध्ये एका निवृत्त नायब तहसीलदार मोहन किस्मत राव याचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आणखीन काही मोठे अधिकारी यामध्ये असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबरनाथ तालुक्यात धरण व्हायच्या आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात याची मोठी चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या
Shivrajyabhishek Din 2022 : यंदा रायगड दुमदुमणार, 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन थाटामाटात साजरा होणार
Pune News : पुण्यात नवजात अर्भकास शौचालयाच्या भांडयात ठेवले कोंबून, पोलिसांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण
Thane News : महापालिका आयुक्तांना निवडणूक आयोगाची नोटीस; अंतिम आराखड्यावर सही न केल्याने मागवला खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
