Maharashtra Headlines 24th June : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल, मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय; भारतीय हवामान विभागाची घोषणा
अखेर मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल झाला आहे. पुढील 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे. राज्याची उपराजधानी नागपुरातही मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
वारकऱ्यांसाठी खुशखबर, विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरु राहणार
आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. त्यामुळे वारकऱ्यांमोठी मोठी गैरसोय व्हायची. कारण रांगेतला कालावधी चार तासांनी वाढायचा. वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर
अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर सुरी ओढली
अगदी अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला आहे. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. वाचा सविस्तर
मावळमध्ये पुन्हा मीच जिंकणार, अजित पवारांनी ताकद लावावी; श्रीरंग बारणेंचं आव्हान
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा ताकद लावून पाहावी, मावळमध्ये मीच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. श्रीरंग बारणे हे पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावही टीका केली. वाचा सविस्तर
देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, आम्ही बोललो तर... देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेला उद्धव ठाकरे यांचं उत्तर
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिलं. "देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. वाचा सविस्तर