एक्स्प्लोर

Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी

Igatpuri Assembly Constituency : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहेत.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency)  काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव (Lucky Jadhav) यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेचा मंडप अचानक उडाला. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत महायुतीतील (Mahayuti) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. हिरामण खोसकर यांना अजित पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसने लकी जाधव (Lucky Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

वादळामुळे उडाला मंडप

लकी जाधव यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप वादळामुळे अचानक उडाला. सभा मंडप उडाल्यामुळे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर मंडप उडाल्यामुळे सभास्थळी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तर हेलिपॅडवरून निघालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी परतला. यानंतर मल्लिकार्जुन खरगे पुन्हा सभा स्थळी दाखल झाले. या सभेतून मल्लिकार्जुन खरगे काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इगतपुरी काँग्रेसचा बालेकिल्ला 

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात 1980 पासूनचा आढावा घेतल्यास 1980, 1985, 1995, 2009 आणि 2014 अशा पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकला होते. 1999 मध्ये पांडुरंग गांगड, तर 2004 मध्ये काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 1990 च्या एकाच निवडणुकीत यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले आहे.  

2019 विधानसभा निवडणुकीतील स्थिती 

• हिरामण खोसकर (काँग्रेस) : 86,561
• निर्मला गावित (शिवसेना) : 55,006
• लकी जाधव (वंचित बहुजन आघाडी) : 9,975
• योगेश शेवरे (मनसे) : 6,566

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात

मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Embed widget