एक्स्प्लोर

नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात

Nashik East-Assembly Constituency : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीत वाद चिघळल्याचे दिसून येत आहे. 

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नाशिक पूर्व मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गणेश गीते निवडणुकीच्या रिंगणात आहे. सुरुवातीला या मतदारसंघात डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप गणेश गीते यांनी केला होता. या पाठोपाठ आज भारतीय जनता पक्षाची रॅली  सुरु असताना गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप सुरु असल्याची माहिती मिळाली. 

नाशिक पूर्वमध्ये वाद चिघळला 

त्यानंतर राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांच्या इथे पोहोचले. यानंतर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप केलाय. तर गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्या फोडल्या, असा आरोप केलाय. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. महाविकास आघाडीचे नाशिकमधील इतर उमेदवार पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत. 

सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपली सभा रद्द करून त्या नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या दिसून रवाना झाल्या आहेत. ही खूप चिंताजनक बाब आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण सुरु आहे. आता मी पहिले पोलीस स्टेशनला जाणार आहे. आमच्या कुटुंबातील माणसांवर असे हल्ले होणार असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन काय करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'

Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Speech Nandurbar | महिलांना 3 हजार, बसचा प्रवासही मोफत राहुल गांधींची मोठी घोषणाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 2 PM : 14 नोव्हेंबर  2024: ABP MajhaBJP Office Vandalisation : भाजप कार्यालयातील तोडफोडीची घटना CCTVत कैदBhaskar Jadhav : शिवसेना स्वत:च्या हिंमतीवर गद्दारी करणाऱ्यांशी सामना करण्यास समर्थ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sharad Pawar: राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची: शरद पवार
राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची: शरद पवार
Embed widget