एक्स्प्लोर

Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?

Karad North Assembly Election 2024 : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्या मनोज घोरपडे यांचं आव्हान आहे.

Karad North Assembly Election 2024  सातारा :महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका कायम महत्त्वाची राहिली आहे. सातारा जिल्ह्यात फलटण, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा, पाटण, कोरेगाव, माण हे मतदारसंघ आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तर, त्यांच्या विरुद्ध भाजपनं मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) यांना उमेदवारी दिली आहे. 

बाळासाहेब पाटील कराड उत्तरचे पाच टर्म आमदार  

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी  1999, 2004,या विधानसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब पाटील विजयी झाले होते. तर, 2009 ला मतदारसंघांची फेररचना झाली होती. त्यानंतरच्या पुढील तीन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी जिंकल्या आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराड, सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील गावांचा समावेश होतो. 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं बाळासाहेब पाटील यांच्या ऐवजी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली. त्यानंतरच्या दोन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिंकल्या होत्या. आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर बाळासाहेब पाटील शरद पवारांसोबत आहेत. 


बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध मनोज घोरपडे यांचं आव्हान

बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध  उमेदवार देण्यासाठी जागा मिळावी यासाठी महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ही जागा भाजपकडे गेली. भाजपमध्ये याजागेसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांचं नाव चर्चेत होते. ऐनवेळी कराड उत्तर मतदारसंघातून भाजपनं यावेळी मनोज घोरपडे यांना उमेदवारी देत 2019 मध्ये झालेली चूक दुरुस्त केली. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडे धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपनं अधिकृत उमेदवार म्हणून धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली. मनोज घोरपडे यांनी  अपक्ष निवडणूक लढवली. मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांचा पराभव झाला होता.  मनोज घोरपडे दुसऱ्या स्थानी तर धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानी राहिले होते.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंखातील उमेदवार

बाळासाहेब पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
मनोज घोरपडे- भाजप
श्रीपते कांबळे- बसपा
अंसारअली पटेल - वंचित बहुजन आघाडी
सर्जेराव बनसोडे - आरपीआय-ए
सीमा पोतदार- राष्ट्रीय स्वराज्य सेना 
सोमनाथ चव्हाण - रासप
अजय सुर्यवंशी - अपक्ष 
दीपक कदम- अपक्ष
निवृत्ती शिंदे- अपक्ष 
बाळासो पाटील-अपक्ष
बाळासो शिवाजी पाटील- अपक्ष
रामचंद्र मारुती चव्हाण- अपक्ष 
वसिम इनामदार- अपक्ष 
वैभव पवार- अपक्ष

इतर बातम्या :

Satara Assembly Election : सातारा जिल्ह्यातील विधानसभा लढती ठरल्या, कोण बाजी मारणार? 8 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Embed widget