एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Speech : देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, आम्ही बोललो तर... उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

Uddhav Thackeray Speech : पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाव मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिलं.

Uddhav Thackeray Speech : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिलं. "देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी विरोधकांची पाटण्यातील बैठक, बीएमसीमधील कथित भ्रष्टाचार, 1 जुलैचा विराट मोर्चा याबाबत भाष्य केलं.

कोरोना काळातील मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडी छाप्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.  उद्धव ठाकरे म्हणाले की, "आता कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहेत. पण त्याचवेळी देशभरातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री न आल्याने त्यांची पोटदुखी आहे. सूरज चव्हाण यांच्यावर धाड टाकली, सूरज साधा शिवसैनिक आहे. यांच्या मनात भीती बसली आहे."

पाटणा भेटीवर फडणवीसांच्या टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले...

पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाव मोहीम होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी पाटण्याला गेलो होतो, पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे. सूरज, शिवसैनिक आणि हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहित. पण मी माझं कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाओ बोलू नका." 

तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होत का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

यासोबतच काल पाटणामध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये भाजपने मेहबूबा मुफ्ती  यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसल्यानंतर भाजपने टीकेची झोड उठवली होती. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी मुद्दामून मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसलो. देवेंद्र हे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत बसलात तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होत का? मग आमचं हिंदुत्व कसं सुटलं? माझं त्यांच्याशी बोलणं झालं की तुम्ही निर्लज्ज लोकांसोबत कसे गेलात? उमर अब्दुला यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं."

हेही वाचा

Devendra Fadnavis : परिवार वाचवण्यासाठी पाटण्यात विरोधकांची बैठक, याचा परिणाम होणार नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon CBI Raid: जळगावच्या 'त्या' ज्वेलर्सच्या दुकानावर सीबीआयचा छापा, शरद पवार गटातील बड्या नेत्याचं कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?
जळगावच्या 'त्या' ज्वेलर्सच्या दुकानावर सीबीआयचा छापा, शरद पवार गटातील बड्या नेत्याचं कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?
Mira Bhayandar Metro: काशीगाव मेट्रो रेल्वेचं काम अडवून ठेवलं अन् 24 कोटींचा मोबदला पदरात पाडून घेतला, भाजपच्या नरेंद्र मेहतांवर मिरा-भाईंदर पालिका मेहेरबान, नेमकं काय घडलं?
काशीगाव मेट्रो रेल्वेचं काम अडवून ठेवलं अन् 24 कोटींचा मोबदला पदरात पाडून घेतला, भाजपच्या नरेंद्र मेहतांवर मिरा-भाईंदर पालिका मेहेरबान, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
BMC : विरोधी पक्षनेत्यांनी गोपनीयता भंग केली, गुन्हा दाखल करणार, रितू तावडेंचा इशारा; माझ्या कार्यालयात फोटो काढले, कसली गोपनीयता भंग केली, किशोरी पेडणेकरांचा प्रतिसवाल
पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देणार, महापौरांचा इशारा; त्यांचे आरोप बालिश, कसली गोपनीयता, किशोरी पेडणकरांचा प्रतिसवाल

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Embed widget