Kolhapur Uttar Vidhan Sabha : बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
या मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासून उमेदवारी कोणाला मिळणार ते अधिकृत दोन उमेदवार शर्यतीतून रद्द आणि आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा पाठिंबा असा प्रवास काँग्रेसचा झाला आहे.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा आणि सर्वाधिक संवेदनशील ठरला आहे. या मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासून उमेदवारी कोणाला मिळणार ते अधिकृत दोन उमेदवार शर्यतीतून रद्द आणि आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा पाठिंबा असा प्रवास काँग्रेसचा झाला आहे. त्यामुळे या सर्व राजकीय उलथाालथीमध्ये या मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसची नाचक्की
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चा नेहमीच कागलच्या राजकारणाची होत असते. मात्र, यावेळी त्याला अपवाद ठरला आहेत कोल्हापूर उत्तरच्या राजकारणामध्ये झालेल्या घडामोडी. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा पत्ता कट होणार हे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसमधून कोणाला उमेदवार दिली जाणार याची चर्चा होती. काँग्रेस आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी पहिल्यांदा राजघराण्यामध्ये उमेदवारीबाबत चर्चा केली होती. मात्र घरात खासदारकी असल्याने तेथून नकार आला. यानंतर पाटील यांनी या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी देण्याचे निश्चित केलं होतं. मात्र महायुतीकडून उमेदवार निश्चित होत असल्याने महाविकास आघाडीकडून सुद्धा बराच वेळ उमेदवार निश्चित करण्यात घेण्यात आला. शेवटच्या टप्प्यात राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
काँग्रेसला दोन अधिकृत उमेदवार देऊन अधिकृत उमेदवारच नाही
मात्र, राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर होताच कडाडून विरोध करण्यात आला. पहिल्यांदा काँग्रेस कमिटीवर हल्ला झाल्यानंतर 26 माजी नगरसेवकांनी पत्र लिहित लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे पाच तासांमध्ये नाट्यमयरित्या मुधरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता बंडाचा झेंडा राजेश लाटकर यांनीही कायम ठेवला. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यांनी माघार न घेतल्याने छत्रपती घराण्याकडून उमेदवारी माघार घेतली आणि राजकीय भूकंप झाला. त्यामुळे काँग्रेसला दोन अधिकृत उमेदवार देऊन सुद्धा अधिकृत उमेदवारच नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अर्ज माघारीच्या शेवटच्या अर्ध्या तासांमध्ये जे नाट्य घडले त्याचा परिणाम अवघ्या राज्याने पाहिला. सतेज पाटील अत्यंत संतापलेल्या स्थितीमध्ये यावेळी दिसून आले. मात्र या सर्व घडामोडीनंतर पाटील यांना त्याचदिवशी संध्याकाळी अश्रु अनावर झाले.
त्यानंतर शाहू महाराज यांनीही निवेदन प्रसिद्ध करत सामान्य कार्यकर्त्यासाठी उमेदवारी माघार घेतल्याचे जाहीर केलं. त्यामुळे आता अपक्ष राजेश काटकर यांच्या विजयाची जबाबदारी सुद्धा आता थेट पाटील आणि शाहू महाराज यांच्यावर येऊन पडली आहे. प्रचार सुरू केल्यानंतर मधुरिमाराजे सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्यासोबत मालोजीराजेही सक्रिय झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर उत्तरचा गड राखण्यासाठी छत्रपती घराण्याला सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे.
महायुतीमध्येही उमेदवारीवरून रस्सीखेच
दुसरीकडे महायुतीमध्येही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार की शिंदे गटाकडे राहणार याबाबतही चर्चा सुरू होती. राजेश क्षीरसागर यांनाच उमेदवारी शिंदे गटाकडून देण्यात आली. तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा मुलासाठी प्रयत्न सुरु केल्याने तसेच सत्यजित कदमही इच्छूक असल्याने उमेदवारीचा घोळ महायुतीमध्येही सुद्धा सुरू होता. क्षीरसागर यांची उमेदवारी गेल्या अडीच वर्षांपासून निश्चित मानले जात असताना त्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं नव्हतं. मात्र त्यांनी मुंबई कोल्हापूर प्रवास करीत उमेदवारी आपल्याच पदरात पाडून घेतली. सीएम शिंदे यांनी क्षीरसागरांसाठी मोठी खेळी करताना काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना पक्षात घेतले. सत्यजित कदमही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे विजय खेचून आणणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळात लक्ष आहे.
2019 मध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये काय घडलं?
2019 मध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध चंद्रकांत जाधव असा सामना झाला होता. सतेज पाटील यांनी चंद्रकांत जाधव यांच्यासारखा उद्योजकाला उमेदवारी देत विजय खेचून आणला होता. त्यांचे 2022 मध्ये दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीतही पाटील यांनी यंत्रणा कामाला लावत विजय पुन्हा खेचून आणला होता. मात्र, आता त्याच जयश्री जाधव शिंदे गटांमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे पाटील यांना धक्का बसला.
या सर्व पार्श्वभूमीवर दोन अधिकृत उमेदवार देऊनही काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसणे आणि राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार करणे या सर्व घडामोडीमुळे आता सतेज पाटील यांचीच प्रतिष्ठ पणाला लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पाटील यांनी काँग्रेससाठी पाच जागा खेचून आणल्या. त्यामुळे पाच जागा जिंकण्यासह उर्वरित महाविकास आघाडीच्या जागा जिंकण्यासाठी तगडे आव्हान आहे.
इतर महत्वाच्या बातम्या