Beed: मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले, बीड येथील धक्कादायक घटना
ही धक्कादायक घटना बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे आज सकाळी उघडकीस आली.
Beed: मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही धक्कादायक घटना बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
हैदरअली तरफदार अब्दुल हसन तरफदार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर, सीमोल बिश्वास विपेंद्रनाथ विश्वास असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मागच्या अनेक दिवसांपासून नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. याच रेल्वेमार्गाच्या कामावरती बीड पासून जवळ असलेल्या ढेकणमोहा येथे पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल येथील मजूर ढेकणमोहा येथे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात.
दरम्यान, 25 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता हैदरअली आणि तरफदार व सीमोल बिश्वास हे दोघे जेवणासाठी बसले होते. यावेळी त्यांनी मद्यपान देखील केले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हैदरअली तरफदारनं सीमोलच्या नाकावर बुक्की मारली. ज्यामुळं सीमोलच्या नाकातून रक्त आले. त्यानंतर उपचार करण्याठी सीमोल गावच्या दवाखान्यात गेला. उपचार घेतल्यानंतर सीमोल पुन्हा कामाच्या ठिकाणी पोहचला. त्यावेळी हैदरअली झोपेत असताना सीमोलनं त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं. पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, शुल्लक कारणावरून टोकापर्यंत जाण्याची मानसिकता गुन्हेगारी प्रवृत्ती येते कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीड: दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण
बीड शहरातील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या सम्राट चौकामध्ये भररस्त्यात दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने लाठी, काठी, लोखंडी रॉड आणि बेल्टने मारहाण केली आहे. यावेळी एक तरुण आपला जीव वाचवण्यासाठी तळघरातील हॉटेलमध्ये घुसला. परंतु, त्याचा पाठलाग करत टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.
हे देखील वाचा-
- धक्कादायक! 12 वर्षीय मुलगी अत्याचारानंतर गर्भवती, पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं, नागपूरमधील घटना
- Nanded Crime : शहरातील पंजाब लॉजवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह, महिला पेशाने डॉक्टर असून आत्महत्या केल्याचा संशय
- खेळण्यातील इलेक्ट्रीक कार खरेदी करण्यासाठी 10 वर्षाच्या दोघा मुलांनी केली चोरी, बंद घरातून 18 हजार रुपयांची रोकड केली लंपास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha