Nanded Lockdown Again | नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या-36 हजारावर गेली आहे. गेल्या 15 दिवसातील कोरोना रुग्णसंख्या 9 हजारावर गेली आहे. कालचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 30 होता
संपूर्णतः बंद:
या दरम्यान शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकन ची दुकाने, पार्लर, सलून,सार्वजनिक ठिकाणी फिरणे हे सर्वतः बंद राहणार आहे.
अत्यावश्यक सेवा यांना राहणार सवलत
- अत्यावश्यक सेवेतील दवाखाने,खसगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, पेट्रोल पंप,गॅस पंप,ही चोवीस तास सुरू राहणार आहेत.
- सकाळी 7 ते 12 या दरम्यान किराणा दुकाने चालू ठेवता येतील.
- त्याच प्रमाणे दूध विक्री, वर्तमानपत्र, पाणीपुरवठा, फळ व भाजीपला विक्री सकाळी 7 ते 10 दरम्यान चालू राहणार आहे.
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व लॉक डाऊन दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केलंय.