एक्स्प्लोर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी होणार, काय आहे कारण?

maharashra budget session : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. मुंबईत तसेच राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. अधिवेशन दहा दिवस होत असल्यामुळे दोन वेळा कोरोना चाचणी होणार आहे.

पाच दिवस कामकाज झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे. जेणेकरून या पाच दिवसात कुणी कोरोना बाधित झाले तर स्पष्ट व्हावे. अधिवेशन 1 मार्च रोजी होत आहे, त्यासाठी आज आणि उद्या चाचणी होणार आहे. तर आठ मार्च ते दहा मार्च कामकाजासाठी सहा आणि सात मार्च रोजी दुसरी कोरोना चाचणी होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Maharashtra Assembly Budget Session | 1 ते 10 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही होणार नाही!

अशा परिस्थितीत मोठं अधिवेशन ठेवणं योग्य नाही - थोरात 

अधिवेशनाच्या कालावधीसंदर्भात बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज अनेक मंत्री कोरोनाबाधित आहेत. आता आमदारांच्या टेस्ट केल्या जातील यात किती बाधित असतील हे अद्याप माहीत नाही.अशा परिस्थितीत मोठं अधिवेशन ठेवणं योग्य नाही. एकीकडे निर्बंध घालायचे आणि दुसरीकडे गर्दी करायची हे योग्य नाही. विरोधक केवळ विरोधाला विरोध करत आहेत, असं थोरात म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका

वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेना मंत्री संजय राठोड, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या. पण सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात नाही दरम्यान नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जाणार आहे. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचं कळतं.

अधिवेशनात नेमके किती दिवस कामकाज होणार? - पहिला दिवस (1 मार्च) - राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव - दुसरा, तिसरा दिवस (2 मार्च, 3 मार्च) - राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा - चौथा, पाचवा दिवस - (4 मार्च, 5 मार्च) - पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान - सहावा, सातवा दिवस (6 मार्च, 7 मार्च) - शनिवार, रविवारची सुट्टी - आठवा दिवस (8 मार्च) - अर्थसंकल्प सादर होणार - नववा दिवस (9 मार्च) - शासकीय कामकाज - दहावा दिवस (10 मार्च) - अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget