महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही : खासदार प्रफुल्ल पटेल
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गोंदिया : महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत, अशा चर्चा सुरु आहे. मात्र, ही चुकीची धारणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलं. गोंदिया इथे सोमवारी (6 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे, हे खरे आहे. मात्र, मुंबईत आयुक्तांच्या अंतर्गत या बदल्या झाल्या. त्यांच्या बदलांच्या पत्रावर मंत्रालय किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्वाक्षरी नव्हती. तसंच या बदल्या महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना न दाखवता या बदल्या झाल्या, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांन रद्द केल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न विचारता या बदल्या केल्या होत्या का? असा सवाल उपस्थित केला जात होता. तसंच महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याची टीकाही झाली होती. त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिलं.
"तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा वारंवार होतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय समिती आहे. त्यामध्ये तिन्ही पक्षांचे दोन-दोन मंत्री आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत असते. महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. तसंच अनेक कामं केली आहेत. मात्र, महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय कोरोनामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही," असे पटेल म्हणाले.
संबंधित बातम्या
- शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात 3 तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई पोलीस उप आयुक्तांच्या बदल्या रद्द?
- मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या गोंधळातून मुख्यमंत्री-मंत्र्यामधील अविश्वास उघड : देवेंद्र फडणवीस
- Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी
- Pawar, Thackeray | पवार-ठाकरे बैठकीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
