एक्स्प्लोर

पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती

पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का देत पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु, हे प्रकरण शिवसेना पक्षप्रमुखांना रूचलेलं नसून पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे.

अहमदनगर : पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशातच, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे. परंतु, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांच्यामार्फत पोहोचवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे त्यांनी पक्षप्रवेश केला होता. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ : अहमदनगर - पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठं खिंडार

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सरकारमध्ये सोबत सत्तेत असताना हा पक्षप्रवेश झाल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, याचा दोन्ही पक्षातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आलं होतं. 'सध्या राष्ट्रवादीत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले 5 नगरसेवक हे आमदार लंके यांना माननारे होते. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला,' असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अहमदनगरचे शिवसेनेच माजी आमदार अनिल राठोड यांनी मात्र यावर टीका करत ही पळवापळवी चुकीचे असल्याचं म्हटलं होतं.

पाहा व्हिडीओ : प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार : अंकुश काकडे

दरम्यान, आता स्वतः शिवसेना पक्ष प्रमुखांनी अजित पवारांना निरोप पाठवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणं हे त्यांनी फारसं रूचलेलं नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सध्या महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Manoj Jarange Patil: 'फडणवीसांनी घेतली तशी भूमिका कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही'; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विखे पाटील सगळंच बोलले, म्हणाले...
'फडणवीसांनी घेतली तशी भूमिका कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही'; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विखे पाटील सगळंच बोलले, म्हणाले...
Sunetra Pawar Beed : रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Uddhav Thackeray Call Abhijeet Dipke : दोन्ही शिवसेना अभिजीत दीपके यांच्या प्रेमात! शिरसाट, बच्चू कडूंपाठोपाठ खैरे भेटीला; ठाकरेंचं दिपके परिवाला 'मातोश्री'वर येण्याचं आमंत्रण, लग्नाबाबतही केली चौकशी
दोन्ही शिवसेना अभिजीत दीपके यांच्या प्रेमात! शिरसाट, बच्चू कडूंपाठोपाठ खैरे भेटीला; ठाकरेंचं दिपके परिवाला 'मातोश्री'वर येण्याचं आमंत्रण, लग्नाबाबतही केली चौकशी

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget