नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी, कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप
आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडनं 25 कोटींचं कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीज कंपनीच्या सहअर्जदार आहेत.
पुणे : पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. कंपनीकडून घेतलेलं 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे. DHFL कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडनं 25 कोटींचं कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीज कंपनीच्या सहअर्जदार आहेत. या 25 कोटीच्या कर्जाची परतफेड न केल्याने लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील 34 कोटीपर्यंत थकबाकी आहे. डीएचएचएफएल कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, या संदर्भात केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झालं होतं. ते आम्ही पुणे पोलीसांना दिले आणि त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर दिले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला या बाबत अद्याप काही माहिती आलेली नाही. पण जर नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट नोटिस दिले असेल तर हे केवळ राजकीय सूडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करत आहे. नारायण राणेंना ज्या बेकायदेशीर पद्धतीने अटक करण्यात आली होती. त्याचेच हे राज्य सरकारचे पुढील पाऊल आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले?
आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर नियमांचे पालन करत आम्ही लुकआउट नोटीस जारी केल्याचे पुणे गुन्हे शाखा आयुक्तांचे म्हणणे आहे.