एक्स्प्लोर

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.

 मुंबई  लोणावळा भुशी डॅम (Lonavala Bhushi Dam)  परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तर भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  विधानसभेत केली.

पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये पुण्याच्या हडपसरमधील अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.  

भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीच्या माध्यमातून निधी

 पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे, कुंपण घालणे, सुरक्षीततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील.

अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार

पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहितीफलक लावणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दुर्गम धोकादायक स्थळीही सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.  भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले.  

हे ही वाचा :

लोणावळ्यात टायगर पॉईंटला जाताय तर ही बातमी वाचा, रात्री 12 पासून लागू झालेत हे नवे पाच नियम 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
Arjun Khotkar on BJP : जरांगे पाटलांचा फटका बसणार सांगत होतो, भाजपनं मराठा समाजाविरोधात चुकीची भूमिका घेतली; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
जरांगे पाटलांचा फटका बसणार सांगत होतो, भाजपनं मराठा समाजाविरोधात चुकीची भूमिका घेतली; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचं होणार दर्शन, देवाचे राजोपचार बंद
आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचं होणार दर्शन, देवाचे राजोपचार बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM : 07 जुलै 2024: ABP MajhaRain Superfast news : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 7 जुलै 2024 : 12 PM : ABP MajhaAjit Pawar In Wari Baramati : पालखी सोहळ्यात अजितदादा सहभागी; हाती टाळ, मुखी माऊलींचा जयघोषBaramati Ajit Pawar : खाली पडलेला मोबाईल दादांनी उचलून दिला, म्हणाले, तुझाच आहे ना?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
Arjun Khotkar on BJP : जरांगे पाटलांचा फटका बसणार सांगत होतो, भाजपनं मराठा समाजाविरोधात चुकीची भूमिका घेतली; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
जरांगे पाटलांचा फटका बसणार सांगत होतो, भाजपनं मराठा समाजाविरोधात चुकीची भूमिका घेतली; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचं होणार दर्शन, देवाचे राजोपचार बंद
आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचं होणार दर्शन, देवाचे राजोपचार बंद
राज ठाकरे निर्दोष... इस्लामपूर न्यायालयाचा निर्णय, 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात मनसे अध्यक्षांना मोठा दिलासा
राज ठाकरे निर्दोष... इस्लामपूर न्यायालयाचा निर्णय, 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात मनसे अध्यक्षांना मोठा दिलासा
Hasan Mushrif : टाळ मृदंगाच्या निनादात अन् जयघोषात तल्लीन झाले मंत्री हसन मुश्रीफ
टाळ मृदंगाच्या निनादात अन् जयघोषात तल्लीन झाले मंत्री हसन मुश्रीफ
उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला धोका देणार, अनिल पाटलांचा दावा; आता पृथ्वीराज चव्हाणांकडून खरपूस समाचार; म्हणाले...
उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला धोका देणार, अनिल पाटलांचा दावा; आता पृथ्वीराज चव्हाणांकडून खरपूस समाचार; म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Embed widget