एक्स्प्लोर

कोळशाचा तुटवडा, राज्यात तब्बल 14 तासांपर्यंत भारनियमन

वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात सध्या तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे.

धुळे : कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अगोदरच ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरणने आणखी एक चटका दिला आहे. राज्याच्या वीज पुरवठ्यात दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट आल्याने हे भारनियमन सुरु झालं. आधीच कोळशाचा तुटवडा, त्यात एसी आणि कुलरचा वाढता वापर आणि रब्बीच्या हंगामामुळे कृषी पंपाचा वाढलेला वापर ही या भारनियमनामागची कारणं सांगितली जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही भारनियमनाची वेळ आतापर्यंत ग्रामीण भागापुरती मर्यादित असलेलं हे भारनियमन आता शहरी भागाकडेही होणार आहे. नवी मुंबईत दिवसातून दोन वेळा 5 तास, नाशिकमध्ये शहरी भागात 3 तास, तर नाशिकच्या ग्रामीण भागात 9 तास भारनियमन सुरु झालं आहे. इतकंच नाही, तर कधीही भारनियमन न होणाऱ्या राज्याच्या राजधानीत अर्थात मुंबईतही आता भारनियमन करण्याचा निर्णय होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती भारनियमन? एकीकडे शहरं गॅसवर असताना ग्रामीण भागात तर या भारनियमनाने पिकं जळून जाण्याची भीती आहे. कारण तिथेही भारनियमनात वाढ करण्यात आली आहे.
  • वाशिम - दिवसातून दोन वेळा 7 तास
  • जळगाव - दिवसातून दोन ते तीन वेळा 7 ते 8 तास
  • नांदेड - शहरात साडे तीन तास, तर ग्रामीण भागात 7 तास
  • सांगली - शहरात नाही, मात्र ग्रामीण भागात तब्बल 10 तास
  • गोंदिया आणि  भंडारा - जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 6 तास
  • वर्धा - शहरात 9 तास तर ग्रामीण भागात 14 तास
  • यवतमाळ - वेगवेगळ्या ठिकाणी विविध वेळी 3 ते 8 तास
  • बीड - शहरात 5 तास तर ग्रामीण भागात 9 तास
  • अहमदनगर - ग्रामीण भागात 8 ते 9 तास, तर शहरी भागात 6 ते 7 तास
  • रायगड - शहरी आणि ग्रामीण भागात 4 तास
  • परभणी – दिवसाला पाच ते सहा तास
  • बुलडाणा – दिवसाला तीन ते आठ तास
  • हिंगोली - दिवसातून दोन वेळा चार-चार असे एकूण आठ तास
  • अकोला – दिवसातून 3 ते 8 तास
कधीकाळी भारनियमनाच्या मुद्द्यावरुन तत्कालीन सरकारला धारेवर धरणारे आज सत्तेवर आहेत. किमान त्यांनी आपली जुनी भाषणं काढून पाहावीत. म्हणजे त्यांची आश्वासनं त्यांना आठवतील.

महत्त्वाच्या बातम्या

वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
पवारसाहेबांची तब्येत व्यवस्थित, काळजी करण्याचं कारण नाही, रोहित पवार रुग्णालयात दाखल, डॉक्टरांशीही केली चर्चा 
पवारसाहेबांची तब्येत व्यवस्थित, काळजी करण्याचं कारण नाही, रोहित पवार रुग्णालयात दाखल, डॉक्टरांशीही केली चर्चा 
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget