एक्स्प्लोर

अजित पवारांना कारखान्यात इंटरेस्ट, 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीत घेतात, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा असली चेहरा वेगळा 

अजित पवारांना साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Sugar Factrory Election) आणि कारखाना ताब्यात ठेवण्यामध्ये  इंटरेस्ट असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली.

Laxman Hake on Ajit Pawar :  अजित पवार (Ajit Pawar) यांना सर्वसामान्य माणसांचं काही देणंघेणं नाही. त्यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Sugar Factrory Election) आणि कारखाना ताब्यात ठेवण्यामध्ये  इंटरेस्ट असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली. ते साताऱ्यात आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजितदादा को-ऑपरेटिव्ह कारखाना ताब्यात घेतात आणि त्याचे खाजगीकरण करुन 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीमध्ये विकत कसा विकत घ्यायचा हे त्यांचं वर्तन आहे. हा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचे हाके म्हणाले. 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. यावरुनच हाके यांनी त्यांच्यावर टीका केली. 

पुण्यामध्ये वाहून गेलेल्या पूलाविषयी अजितदादांना काही घेणेदेणे नाही

पुण्यामध्ये वाहून गेलेल्या पूलाविषयी अजितदादांना काही घेणेदेणे नाही. ते मात्र माळेगावमध्ये गावोगाव फिरुन एखाद्या ग्रामपंचायतची निवडणूक असल्यासारखे रममान आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीला गावांमध्ये सभा घेत असेल तर त्यांचा असली चेहरा वेगळा आहे आणि दाखवायचा चेहरा वेगळा आहे असंच त्यांना म्हणावं लागेल अशी टीका हाके यांनी केली. ऑगस्ट अखेरीस नांदेड ते मुंबई आरक्षणाच्या हक्कासाठी लॉंग मार्च काढणार आहोत. ओबीसींचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारु असेही हाके म्हणाले. 

आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत कोणी पडू नये

महाज्योतीला फंड मिळावा याबरोबरच सर्व विभागाच्या  महामंडळांना निधी मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. याचे उत्तर न देता वैयक्तिक पातळीवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर टीका करत आहेत. कोणी कितीही टीका केली तरी आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत असेही हाके म्हणाले. माळेगाव निवडणुकीत आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र एवढ्या साध्या निवडणुकीत अजित पवार यांना शोभतं का? हा माझा सवाल आहे असे हाके म्हणाले. मी एका मेंढपाळाचा मुलगा आहे आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत कोणी पडू नये. तुम्ही आमच्या केसाला धक्का लावून दाखवा. मग या महाराष्ट्रातलं काय वातावरण असतं, ते दाखवू. तुमच्या धमक्यांना आमचा ओबीसी बांधव भीक घालत नाही असेही हाके म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, हाकेंचा पुन्हा हल्लाबोल 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget