पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, हाकेंचा पुन्हा हल्लाबोल
अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही. पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे.

Laxman Hake : अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही. पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे. अजित पवारांना एखादा व्यवसाय करावा असेही हाके म्हणाले. सामाजिक न्याय आणि अजित पवारांचा काहीही संबंध नाही. एकाही ओबीसी वसतिगृहासाठी त्यांनी निधी दिलेला नाही असा आरोप लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केला.
अजित पवारांचा पक्ष हा सरंजामांचा पक्ष
लक्ष्मण हाके आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाद संपायचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांना लक्ष करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परभणीच्या गंगाखेडमधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यलायाला भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांचा पक्ष हा सरंजामांचा पक्ष आहे. अजित पवारांना सत्तेसाठी आचार विचार ध्येय धोरणे काहीही नाहीत. पैसे कमावणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळं त्यांनी एखादा व्यवसाय करावा असा सल्ला हाकेंनी अजित पवारांना दिला.
अजित पवारांनी दुसरीकडे प्रचंड निधी वाटला, मात्र ओबीसींच्या वसतिगृहासाठी एक रुपयाही दिला नाही
अजित पवारांनी दुसरीकडे प्रचंड निधी वाटला मात्र ओबीसींच्या वसतिगृहासाठी एक रुपयाही दिला नाही. महाज्योतीलाही पैसे दिले नाहीत. सामाजिक न्याय आणि अजित पवार यांचा संबंध नसल्याचेही हाके म्हणाले. त्यामुळं थेट अजित पवारांवर गंभीर आरोप केल्याने आता राष्ट्रवादीचे नेते याला काही उत्तर देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मागील दोन ते तीन दिवसाखाली देखील हाकेंनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालतात, आता अजित पवार यांना पंख फुटलेत असेही हाके म्हणाले होते. अजित पवार हे पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी ओबीसींचा निधी अडवला अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी पार्थ पवार यांच्यावरही टीका केली होती. अजित पवारांचा मुलगा निवडणुकीत पडला. पार्थ पवार यांना पुन्हा राजकारणात आणता आलं नाही. त्याला पडलेल्या मतावरुन त्याची लायकी शोधायची का असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी केला होता.
महत्वाच्या बातम्या:
Laxman Hake : अजित पवारांचा पोरगा पडला, पार्थला पडलेल्या मतावरुन त्याची लायकी शोधणार का? लक्ष्मण हाकेंचा अमोल मिटकरींना सवाल


















