दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
उपोषणाला बसल्यानंतर दीड दिवस मी पाणी पिलो नव्हतो. यानंतर मला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी मला फोन केल्याची माहिती लक्ष्मण हाकेंनी सांगितली.
Laxman Hake Majha Katta : उपोषणाला बसल्यानंतर दीड दिवस मी पाणी पिलो नव्हतो. यानंतर मला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी मला फोन केले. त्यांनी पाणी घेण्याची विनंती केल्याचे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सांगितले. लक्ष्मण हाके हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांवी विविध मुद्यावर संवाद साधला. मी यापूर्वी 2014 साली 9 दिवसांचं उपोषण केलं होतं. आता यावेळी मी 10 दिवसांचे उपोषण केले. आणखी पाच दिवस मी आहे असे उपोषण करु शकलो असतो असेही हाके म्हणाले.
उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी अन्न पाण्याचं भान राहत नाही
उपोषण करताना काही डॉक्टरांनी किडणीच्या संदर्भात सांगितलं. तुम्ही उपोषण पुन्हा करु शकता. जास्त दिवसांच्या उपोषणामुळं किडणीवर परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. ज्यावेळी तुमचं उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी तुम्हाला अन्न पाणी याचं भान राहत नाही असे लक्ष्मण हाके म्हणाले, उपोषण करताना पहिले दोन दिवसच त्रास झाला. सगळं पोट ज्या दिवशी रिकामं झालं त्यादिवसापासून त्रास कमी झाल्याचे हाके म्हणाले. मी सलग दहा दिवस उपोषण केलं, आणखी पाच दिवस मी उपोषण करु शकलो असतो असेही हाके म्हणाले.
प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केलं
मी गरीब कुटुंबातून आलो आहे. प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. सलग दोन तीन सुट्ट्या आल्या की आई वडिलांबरोबर ऊस तोडणीच्या कामाला जात होतो असंही हाकेंनी सांगितलं. दरम्यान, आमचं आंदोलन हे तरुणांनी हाती घेतलं होतं. आम्हाला मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आमचे हक्क मिळवण्यासाठी मी लढत आहे. सध्या राजकारणात जायचा विचार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. माझ्या मनात लोकसभा विधानसभा लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही. ओबीसींचा आवाज असला पाहिजे. ही चळवळ पुढे गेली पाहिजे यासाठी आम्ही लढत असल्याचे हाके म्हणाले. अनेक पक्ष निर्माण झाले पण काळाच्या ओघात ते पक्ष संपल्याचे हाके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: