एक्स्प्लोर
लातूरमध्ये टाकी साफ करताना विषारी वायूमुळे 9 जण अडकल्याची भीती
![लातूरमध्ये टाकी साफ करताना विषारी वायूमुळे 9 जण अडकल्याची भीती Latur Nine Workers Feared To Stuck In Kirti Oil Mill Soda Tank लातूरमध्ये टाकी साफ करताना विषारी वायूमुळे 9 जण अडकल्याची भीती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/30210423/Latur-MIDC-Kirti-oil-tank.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : लातूर एमआयडीसीतील कीर्ती ऑईल मिलमध्ये टाकी साफ करताना अपघात झाला आहे. विषारी वायूमुळे नऊ कर्मचारी आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ऑईल मिलमधील सोड्याची टाकी साफ करताना संध्याकाळी अपघात घडला. टाकी साफ करण्यासाठी काही कर्मचारी आत उतरले होते. मात्र त्यात तयार झालेल्या विषारी वायूमुळे हे कर्मचारी बेशुद्ध पडले. ते का आले नाहीत, हे पाहण्यासाठी आणखी काही कर्मचारी आता उतरले. मात्र तेही बाहेर आले नाहीत.
याची माहिती इतर कर्मचाऱ्यांना मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आलं. मात्र विषारी वायूमुळे मदत पोहचण्यात अडथळे येत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नऊ कर्मचारी आत अडकल्याचं बोललं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)