एक्स्प्लोर

VIDEO : धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत

पिंपरी-चिंचवड : धावत्या ट्रेनमधून उतरु नये अशा प्रकारच्या सूचना वारंवार देऊनही काही महाभाग विषाची परीक्षा घेतातच. लोणावळा रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला रेल्वे पोलिसांमुळे जीवनदान मिळालं आहे. धावत्या काकिनाडा एक्स्प्रेसमधून उतरताना एक तरुण आणि तरुणी प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करताना पडले. तरुण रेल्वेपासून लांब फेकला गेला तर तरुणी मात्र रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकली. ही दृश्य पाहताना प्लॅटफॉर्मवर उपस्थितांनी क्षणभर डोळे मिटले. मात्र फलाटावरील एका पोलिसांनी चपळाई दाखवत त्या तरुणीला बाहेर खेचलं. अंगावर शहारा आणणारा तो प्रसंग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबलचं नाव पवन तायडे असून पोलीस नाईक राहुल मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अजय गायकवाडही मदतीला धावून गेले.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी काकिनाडा एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवर आली तेव्हा सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. दोन मिनिटांचा थांबा घेऊन रेल्वे मुंबईच्या दिशेने पुढे निघाली असता, एक वृद्ध व्यक्ती गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात फलाटावर पडली. तेव्हा फलाटावर उपस्थित काही प्रवाशांनी त्यांना बाजूला घेतलं आणि तिथं एकच गोंधळ उडाला. हे पाहून ड्युटी बजावत असलेल्या तायडे, मोरे आणि गाईकवाड यांनी तिकडे धाव घेतली. तितक्यात त्याच धावत्या रेल्वेच्या दुसऱ्या बोगीतून एका तरुणाने आणि तरुणीने देखील उतरण्याचा प्रयत्न केला. तो तरुण रेल्वेपासून दूर फेकला गेला मात्र ती तरुणी त्याच रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळीत पडली. यापूर्वीही अनेक वेळा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या किंवा उतरण्याच्या नादात काही प्रवाशांनी जीव गमावले आहेत, तर काही जण जखमी झाले आहेत. असे प्रकार न करण्याच्या वारंवार सूचना पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे. पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरलाMaharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget