Ladki Bahin Yojana EKYC : लाडक्या बहिणींनो KYC करताना सावधान, फेक वेबसाईटवर चुकून क्लिक करू नका!
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. अशात इंटरनेटवर एक बनावट वेबसाईट समोर आलीये. त्यामुळे केवायसी करण्याआधी ही बातमी वाचा.

तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची केवायसी (Ladki Bahin Yojana EKYC) करत असाल तर सावधान. कारण एक बोगस वेबसाईट (Fake Website Ladki Bahin Yojana) समोर आलीये. ही सरकारची वेबसाईट नसून फेक साईट आहे. त्यामुळे यावर कुणीही चुकून केवायसी करू नका.
लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक करण्यात आलीये. आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीये. पण केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc यावरच केवायसी पूर्ण करावी.
बोगस वेबसाईट समोर (Fake Website Ladki Bahin Yojana)
गुगलवर केवायसी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत. त्यापैकी https://hubcomuat.in/ ही वेबसाईट (Fake Website) गुगलवर सर्चमध्ये येत आहे. पण ही सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे. त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या.
केवायसी करताना अडचणी (Ladki Bahin Yojana EKYC)
लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ठप्प झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतेय. कारण केवायसी करताना एरर येत आहे. तर काही जणांना ओटीपी येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.
यासोबत केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार नंबर बंधनकारक करण्यात आले आहे. पंरतु बऱ्याच लाभार्थ्यांना पती हयात नाहीत. किंवा वडील देखील नाही. त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की, केवायसी करताना आधार नंबर कुणाचा टाकायचा.
ओटीपी येण्यास अडचण (OTP Problems Ladki Bahin Yojana EKYC)
लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी (Ladki Bahin Yojana Ekyc Problem) करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे.
























