Kolhapur : धक्कादायक! शिकारीसाठी आलेल्या इसमाचा घोरपडीवर बलात्कार
कोल्हापुरातील गोठणे येथे शिकारीसाठी आलेल्या एका इसमाने घोरपडीवर बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
![Kolhapur : धक्कादायक! शिकारीसाठी आलेल्या इसमाचा घोरपडीवर बलात्कार Kolhapur forest department news hunter raped Ghorpadi three attested Kolhapur : धक्कादायक! शिकारीसाठी आलेल्या इसमाचा घोरपडीवर बलात्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/1083554b097b4e9cecde6723b6508822_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे विनापरवाना शस्त्रासह घुसलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एका धक्कादायक माहितीचा खुलासा झाला आहे. या आरोपीनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींचे मोबाईल तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची यावर वन अधिकारी चर्चा करत आहेत.
काही शिकारी कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आले होते. व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्यामुळे या शिकारींना अटक करण्यात वनविभागाला यश मिळालं होतं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
यातील एका आरोपीने घोरपडीवर बलात्कार केला असून त्यावेळचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्यात आले होते. आता त्यावरुनच या आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वनविभागासमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे या आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद करायचा. संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
एखादा शिकारी आला तर, त्याने शिकार केली तर त्याच्यावर कोणत्या कलमांतर्गत कारवाई करायची हे ठरलेलं असतं. पण आता वन्यप्राण्यावर बलात्कार केल्यामुळे कशी कारवाई करायची हा पेच वन्य अधिकाऱ्यांसमोर आहे.
राजस्थानमध्ये काही वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. आठ जणांनी एका पाळीव शेळीवर बलात्कार केला होता. त्यावर आरोपींना शिक्षा झाली होती. मात्र शेळी ही पाळीव प्राणी आहे, घोरपड ही वन्य प्राणी आहे. त्यामुळे यावर अमरावतीच्या एका तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. कोल्हापुरात गोठणे येथे घडलेला प्रकार हा अत्यंत किळसवाणा असून आतापर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)