एक्स्प्लोर
कचऱ्याचं सोनं, सोन्याचा कचरा, कोल्हापूरच्या 'एकटी'ने करुन दाखवलं!
कोल्हापूरच्या एका स्वयंसेवी संस्थेने कचराप्रश्नी भन्नाट आयडिया काढली आहे. ‘एकटी’ या संस्थेने कचरा गोळा करुन, त्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं सेंद्रिय खत तयार केलं.
कोल्हापूर: राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सध्या सर्वात मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये तर कचराप्रश्नी मोठमोठी आंदोलनं झाली.
मात्र कोल्हापूरच्या एका स्वयंसेवी संस्थेने कचराप्रश्नी भन्नाट आयडिया काढली आहे. ‘एकटी’ या संस्थेने कचरा गोळा करुन, त्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं सेंद्रिय खत तयार केलं. याच खताचा ‘खत महोत्सव’ भरुन अक्षरश: कचऱ्याचं सोनं केलं आहे.
कचऱ्याचं सोनं
एकटी ही संस्था कोल्हापुरातील निराधार महिलांसाठी काम करते. गेली अनेक वर्षे इतर शहरांप्रमाणेच कोल्हापुरातही वाढणाऱ्या कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
खत महोत्सव
यावर उपाय काढण्यासाठी “एकटी” या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी, कोल्हापुरातील बेरोजगार आणि कचरा वेचक महिलांना एकत्र केलं. त्यांच्यामार्फत डम्पिंग ग्राऊंडवर जाणारा रोजचा कचरा गोळा केला आणि त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.
दररोज जमणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती केली. कोल्हापूरकरांनी टाकलेल्या कचऱ्यातून सेंद्रिय खत तयार करुन, तेच खतरुपी सोनं पुन्हा कोल्हापूरकरांना नाममात्र किंमतीत देण्यासाठी अनोखा “खत महोत्सव” भरवला.
घराघरातील कचऱ्यातून 50 टन खत
कोल्हापुरातील अनेक वॉर्डमध्ये कचरावेचक महिला फिरुन, लोकांच्या घरातून हा कचरा गोळा करत आहेत. त्यापासून सुमारे 50 टन खताची निर्मिती करण्यात आली आहे.
नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करुन, ते पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
‘एकटी’सारख्या संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमाची दखल राज्य सरकार आणि इतर महापालिकांनी घेऊन, जर असा प्रकल्प उभा केला, तर महाराष्ट्रातील कचऱ्याची समस्या काही वर्षातच कचऱ्या सारखीच नष्ट होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement