एक्स्प्लोर
Advertisement
कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू
मुंबई : आजपासून कोकण रेल्वे पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. दरवर्षी कोकण रेल्वे आपलं पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून लागू करते. यावर्षीही याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.
कोकण रेल्वेच्या या नव्या पावसाळी वेळापत्रकानुसार कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा 1 तासाच्या फरकानं बदलण्यात आल्या आहेत. यात राजधानी, जनशताब्दी आणि तेजससारख्या वेगवान ट्रेन्सचाही समावेश असेल.
कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. पावसात नेहमीच निवसर आणि पोमेंडीजवळ ट्रॅक खचतो. त्यासाठी कोकण रेल्वेवरील गाड्यांचा वेग कमी केला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement