Kirit Somaiya : कोर्लई ग्रामपंचायतीला किरीट सोमय्यांनी दिली भेट, संतप्त शिवसैनिकांनी कार्यालयात शिंपडले गोमूत्र
कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आज कोलई गावाला भेट दिली.
Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर रायगडच्या कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळेस किरीट सोमय्या यांच्यासोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यां विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळेस, शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करून ग्रामपंचायत कार्यालयात गोमूत्र देखील शिंपडलं.
रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे असलेल्या 19 बंगल्याच्या घोटाळ्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केले होते. याप्रकरणी, कोर्लई येथील सरपंच प्रशांत मिसाळ यांनी या ठिकाणी कोणतेही बंगले नसल्याचं स्पष्टीकरण केले होते. तर या बंगल्याच्या नोंदी संदर्भात कर देखील भरण्यात आला असून कागदोपत्री नोंद असलेले बंगले कसे आणि कुठे गायब झाले असा सवाल करत किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात, किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई येथे ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळेस कोर्लई ग्रामपंचायती बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, तर ग्रामपंचायत जवळ वाहन आणि गावकऱ्यांना सुद्धा मज्जाव करण्यात आला होता.
कोलईत तणावाचं वातावरण
आज दुपारच्या सुमारास किरीट सोमय्या यांनी कोर्लई येथील ग्रामपंचायतीला भेट दिली असता त्यांच्यासोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी शिवसैनिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येऊन भाजप कार्यकर्त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलिसांनी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांना कार्यालय परिसराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला, तर किरीट सोमय्या यांच्या जाण्यानंतर शिवसैनिकांनी कार्यालयात गोमूत्र शिंपडून कार्यालयाचा परिसर शुद्ध करण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
- Kirit Somaiya Press Conference : निकॉन कंपनीशी निल सोमय्यांचा संबंध आहे की, नाही? किरीट सोमय्या म्हणाले...
- Kirit Somaiya : 18 बंगल्यांचं वास्तव काय? कोर्लईत पाहणीसाठी सोमय्यांचा दौरा, त्यापूर्वी मुंबईत गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha