Kirit Somaiya Press Conference : निकॉन कंपनीशी निल सोमय्यांचा संबंध आहे की, नाही? किरीट सोमय्या म्हणाले...
Kirit Somaiya Press Conference : Nikon Company मध्ये भागीदार आहेत की नाही? पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं
Kirit Somaiya Press Conference : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील खुन्नस काढण्यासाठी संजय राऊत यांनी आपल्या नावाचा वापर का केला, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले नसतील तर त्याची घरपट्टी का भरली? असा सवाल त्यांनी केला. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला. अशातच काल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांचा निकॉन कंपनीशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
निकॉन कंपनी किरीट सोमय्यांची असून राकेश वाधवान त्यांचे पार्टनर असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र राऊतांचे हे आरोप फेटाळत वाधवान यांच्याशी संबंध नसल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "आम्ही एक दमडीचीही चूक केलेली नाही. मुद्दा निकॉन कंपनीत आहे की, आणखी कोणत्या तो नाही. मुद्दा हा आहे की, राकेश वाधवान पार्टनर आहे तो आहे. मी स्पष्टच सांगितलं तसं काहीही नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "व्यावसाय सगळेच करतात. राकेश वाधवान हा प्रश्न आहे, तसं काहीच नाहीये. त्या कंपनीत राकेश वाधवान नाहीत. दूरपर्यंत संबंध नाही." तसेच पीएमसी बँक, राकेश वाधवान आणि माझा, माझ्या कुटुंबियांचा दमडीचा संबंध नाही, असं म्हणत त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत.
पाहा व्हिडीओ : Kirit Somaiya : Nikon Company त भागीदार आहेत की नाही? पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं
शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपाची धार आणखीच तीव्र होऊ लागली आहे. किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिले. संजय राऊत यांनी कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावे असे सोमय्या यांनी म्हटले. कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोव्हिड सेंटरमधील घोटाळ्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. सगळे पुरावे दिले तरी कारवाई होत नसल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. त्याऐवजी संजय राऊत आम्हाला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर राग काढायचा होता तर नील सोमय्या यांच्यावर आरोप करण्याची आवश्यकता नव्हती असेही सोमय्या यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पाच वर्षापूर्वीची माहिती दिली. आमची खुशाल चौकशी करावी आम्ही तयार आहोत असे प्रतिआव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kirit Somaiya : खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण... किरीट सोमय्यांचं प्रतिआव्हान
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा