एक्स्प्लोर

किरीट सोमय्यांना आज केवळ ड्रामेबाजी करायची होती, कोर्लई गावचे सरपंच म्हणतात...

कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी भेट दिली. दरम्य़ान सोमय्यांनी आज कोर्लई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक होताना दिसले.  यावेळी सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. काय म्हणाले सरपंच

सोमय्याांना आज केवळ ड्रामेबाजी करायची होती, कोर्लई गावच्या सरपंचाची माहिती
रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात आले होते. कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आहे. सरपंच प्रशांत मिसाळ म्हणतात, किरीट सोमय्या जाणून बुजून हे करत आहेत. माहितीच्या अधिकारातून सोमय्यांनी ही माहिती मागवली, तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे, आज ते ग्रामपंचायत कार्यालयात आले, बसले, आणि काही न बोलता पत्र देऊन गेले. आज फक्त त्यांना ड्रामाबाजी कायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे. हा फक्त गावाला बदनाम करण्याचा डाव आहे. माहितीचा अधिकार सर्वांना आहे, त्यांनी जी माहिती मागितली, ती त्य़ांना देण्यात आली आहे.  खोडसाळ वृत्तीने त्यांना ड्रामा करायचा होता. 

सोमय्या-राऊत वाद शिगेला 

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटत चाललाय. संजय राऊत गेल्या ३ दिवसांपासून आरोपांच्या फैरी झडतायेत, त्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी किरीट सोमय्या पुढे येतायेत. त्यामुळं प्रश्न असा आहे, हे दोघं नेते एकमेकांवर जे आरोपप्रत्यारोप करतायेत ते सर्व आधी सिद्ध करुन दाखवणार? की फक्त एकमेकांना लाखोल्या वाहण्याचा कार्यक्रम सुरु राहणार? 

सोमय्यांचा नेमका आरोप काय? 

अलिबागमधील 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचं सांगितलं. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.

कोर्लई गावच्या सरपंचानी abp माझाला माहिती दिली
सरपंच मिसाळ यांनी माहिती दिली, कोलई गावात बंगले होते कि नव्हते?  प्रत्यक्षात 19 बंगले नव्हते, 18 बंगले होते, अन्वय नाईक यांनी घेतलेल्या जागेवर 18 बंगले होते. खरेदी केल्यानंतर अन्वय नाईक यांनी ती घरं पाडली. घरं पाडून रश्मी ठाकरे, मनिषा वायकरांनी विकली. पूर्वी बंगले असल्यानं ठाकरे यांनी घरपट्टी भरली,. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची कधीही माफी मागितली नाही. अशी माहिती कोर्लई गावच्या सरपंचानी abp माझाला माहिती दिलीय. सरपंचांनी सोमय्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे

राऊतांनी सोमय्यांचे दावे फेटाळले

सोमय्या म्हणाले होते, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला. त्यावर आज कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी ही माहिती देत सोमय्यांचा दावा फेटाळून लावला आहे. 

अलिबागच्या आमदारांचा सोमय्यांना इशारा 

मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असाल तर उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी दिला आहे. सोमय्यांनी खोटे आरोप करु नये अशी विनंतीही दळवी यांनी केली आहे. आदेश असेल तर शिवसेनेचा दणका दाखवू, असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget