Kirit Somaiya : 18 बंगल्यांचं वास्तव काय? कोर्लईत पाहणीसाठी सोमय्यांचा दौरा, त्यापूर्वी मुंबईत गुन्हा दाखल
Kirit Somaiya : कोर्लई गावात ठाकरे परिवाराचा एकही बंगला नाही,कोर्लई गावच्या सरपंचांनी सोमय्यांचे दावे खोडून काढले, सोमय्या उद्या कोर्लई गावाला भेट देणार
Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. हा दावा कोर्लई गावाच्या नागरिकांनी खोडून काढला आहे. दरम्यान आता 18 फेब्रुवारीला सोमय्या कोर्लई गावाला भेट देणार आहेत. तसंच 19 बंगल्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच, किरीट सोमय्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती स्वतः किरीट सोमय्यांनी ट्वीट करत दिली आहे.
मुंबई पोलिसांकडून नोटीस मिळाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी ट्वीट करत नोटिशीची माहीती दिली आहे. भुजबळांच्या सांताक्रूझ भागात असलेल्या बंगल्याची पाहणी केल्याप्रकरणी नोटिस देण्यात आल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. तसेच या नोटिशीचा फोटोही किरीट सोमय्यांनी ट्वीट केला आहे.
किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "ठाकरे सरकार/पोलीस ची माझा विरुद्ध आणखी एक नोटीस. छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील 'बेनामी प्रॉपर्टी' 9 मजली बंगलोची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल"
सोमय्यांचा नेमका आरोप काय?
अलिबागमधील 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचं सांगितलं. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.
राऊतांनी सोमय्यांचे दावे फेटाळले
सोमय्या म्हणाले होते, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला. त्यावर आज कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी ही माहिती देत सोमय्यांचा दावा फेटाळून लावला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
- Kirit Somaiya Press Conference : निकॉन कंपनीशी निल सोमय्यांचा संबंध आहे की, नाही? किरीट सोमय्या म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha