दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्यांनी ट्विट करून दिली माहिती
दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याकडून देण्यात आले आहेत. अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
kirit somaiya : "शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे अवैध असलेले दापोलीमधील साई रिसॅार्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याकडून देण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर सतत त्याचा पाठपुरावा केला होता.
अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॅार्टचे बांधकाम बेकायदेशीर असून सीआरझेड (CRZ) कायद्दाचे उल्लंघन करून हे रिसॅार्ट बांधल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महाविकास आघाडी विरूद्ध केंद्र सरकार वाद पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्राच्या या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला,अनिल परब यांचेही रिसॉर्ट पाडले जाईल"
मुरुड ( ता. दापोली ) येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर असून ते पाडले जाणार असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. "फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते. त्यानंतर सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती.
दरम्यान, या प्रकरणी अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्यांना माझी माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीचे उत्तर दिले आहे. सरकारने ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे त्यांना नोटीस दिली आहे, असे परब यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी गुन्हा दाखल करावा, किरीट सोमय्या यांचे आव्हान
Sanjay Raut On Kirit Somaiya: '...यांची मुलं चणे फुटाणे विकतात का?' किरीट सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया